Skip to main content

Posts

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...

खारेपाटण येथील पुरातन किल्ला

#सफर_ तळकोकणच्या_इतिहासाची  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार समजले जाणारे खारेपाटण, आजच्या मुंबई - गोवा महामार्गालगत वसलेले एक शांत व रम्य खेडे. परंतु, एके काळी हेच गाव व्यापारी जहाजांच्या येण्या-जाण्याने गजबजलेले असायचे !  कोकणात पुर्वापार व्यापार व वाहतूकीसाठी इथल्या नद्यांचा वापर होत आला आहे. सहाजिकच, या नद्यांच्या किनार्‍याने व त्यांच्या मुखाशी अनेक महत्त्वाची खेडी, बंदरे व व्यापारी केंद्रे उदयास आली. ‘खारेपाटण’ या गावची कथा सुद्धा अशीच काहीशी!  वाघोटन नदीच्या किनार्‍यावर हे गाव वसलेले आहे. हिंदू, मुसलमान, जैन व ज्यू लोकांची सुद्धा येथे वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. खारेपाटण याचे मूळ प्राचीन नाव 'बळीपट्टण'. दक्षिण व उत्तर कोकणच्या शिलाहारांच्या लेखातही या नावे खारेपाटणचा उल्लेख सापडतो. शिलाहारांच्या दक्षिण कोकण शाखेतील 'धम्मियार' या राजाने येथे दुर्ग व शहर वसवल्याची नोंद त्याच वंशातील 'रट्टराज' याच्या शिलालेखात आढळते. त्या काळापसूनच, खारेपाटण हे एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पुढे, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीज प्रव...

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

शंभू राजांच्या नजरेतून शिवराज्याभिषेकाचे वर्णन

‘या युगी पृथ्वीवर सर्व म्लेंच्छ बादशाह. मराठा पातशाह येवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काहीं सामान्य झाली नाही.’  सभासद बखरीत शिवराज्याभिषेकाचे हे अजरामर वर्णन सर्वश्रुत आहे. राजाभिषेकाच्या या अभुतपूर्व सोहळ्याचे वर्णन अनेकांनी आपापल्या परीने करून ठेवले आहे. यातील काहींनी ऐकीव माहितीच्या आधारे वर्णन लिहिले तर अनेकांनी तो सोहळा प्रत्यक्ष याची देहि, याची डोळा अनुभवला. त्यामध्ये कृष्णाजी अनंत सभासदासारखे बखरकार, निश्चलपुरी गोसावी सारखे साधू, हेन्‍री ऑक्झेंडन सारखे टोपीकर, इ. अनेकांचा समावेश आहे. यापैकी एक अतिशय महत्त्वाचे नाव म्हणजे युवराज संभाजी राजे. राज्याभिषेकप्रसंगी, संभाजी राजांना देखील युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला होता. राज्याभिषेक ही घटना केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष सिंहासनारोहणाच्या आधी व नंतरही अनेक दिवस हा सोहळा सुरू होता. शिवकालात रायगडाचे वास्तुवैभव, तुलादान व अन्य विधी, तसेच राज्याभिषेकाची एकूणच व्याप्ती व स्वरूप याचे संक्षिप्त परंतु गौरवपूर्ण वर्णन युवराजांनी आपल्या ‘बुधभुषण’ या राजनीतीपर ग्रंथात केलेले आहे. राजाभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने ते अ...

शिवपुण्यतिथी 🌸

'छत्रपती शिवाजी महाराज' हे तीन शब्द अक्षरशः मंतरलेले आहेत. महाराजांचे अवघे आयुष्य - अवघे शिवभारत केवळ पन्नास वर्षांचे! पण त्याची व्याप्ती, त्याचे विविध पैलू आजही सुसंगत वाटणारे. महाराष्ट्राला तर या नावाने मोहिनी घातली आहे. परंतु महाराष्ट्राबाहेरही कविराज भूषण, छत्रसाल यासारख्या कित्येक लोकांना शिवचरित्राने भारावून टाकले. भूषण आपल्या एका छंदात म्हणतात,  " सिव चरित्र लखी यों भयो कबि भूषन के चित्त | भाँति भाँति भूषनिनि सों भूषित करौ कबित्त ||" अर्थात 'शिवरायांचे चरित्र पाहून भूषणाचे कवीमन विलोभले. भूषण म्हणतो काव्य अशाच विषयावर (शिवचरित्रावर) करावेसे वाटते जेथे विविध अलंकार शोभून दिसतात!"    एतद्देशीयांच्या बरोबरीने परकियांनाही महाराजांच्या पराक्रमाचा व एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अचंबा वाटल्याशिवाय राहिला नाही.  जितक्या वेळा वाचावे, ऐकावे, बोलावे तितक्या वेळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू नव्याने उलगडत जातो. एक उत्कृष्ट योद्धा, प्रजेच्या सुखासाठी कटिबद्ध असा दक्ष शासक, सावध आणि मुत्सद्दी राजनीतितज्ञ, उत्तम दुर्गस्थापत्यकार या आणि अशा कित्येक गुणांमु...

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

शंभूछत्रपती आणि सेतु बांधणी

नुकताच अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहोळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभू श्री रामाच्या जीवनातील अद्भुत प्रसंग आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यातीलच एक म्हणजे सेतू बांधणी !  लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी श्री रामाने वानर सेनेच्या मदतीने केलेल्या सेतू बांधणीची कथा आपण सर्वांनी अनेकदा ऐकलेली आहे. पण असाच एक सेतू बांधणीचा प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांनी देखील केला होता. तीच हकीकत थोडक्यात -  जंजिरेकर सिद्दी हा स्वराज्याला कायम डाचणारा शत्रू. सभासदाने त्याचे वर्णन ' घरात जैसा उंदीर तैसा ( हा ) शत्रू ' या शब्दात केलें आहे. छत्रपती शिवरायांनी अनेकदा प्रयत्न करूनही दुर्दैवाने त्यांना सिद्दीला मुळापासून उखडून टाकण्यात यश आले नाही. इ. स. १६८० - ८१ च्या सुमारासही मुंबईच्या इंग्रजांच्या आश्रयाने स्वराज्याच्या किनारपट्टीवरील प्रदेशावर त्याचे छापे एकसारखे सुरू होते. ही ब्याद एकदाचीच उपटून वडिलांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे आणि रयतेचे होणारे हाल थांबवावे या हेतूने छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दिविरुद्ध जोरदार मोहीम उघडली. त्याचे नेतृत्व त्यांनी स्व...

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न: किल्ले साल्हेर  इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या...

शंभूछत्रपतींचे बलिदान पर्व - सरदेसाई वाडा, कसबा संगमेश्वर

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन शौर्य आणि पराक्रमाने नटलेले आहे तर दुसरीकडे त्यांचा मृत्यु म्हणजे अतुल्य धैर्य! त्यांच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि औरंगजेबाला इथेच मूठमाती देता झाला. पण शंभूछत्रपतींच्या चरित्रातील या बलिदान पर्वाला सुरुवात झाली ती कसबा संगमेश्वर या गावी... कसबा संगमेश्वर हे अलकनंदा, शास्त्री आणि वरुणा नद्यांच्या संगमावर, गर्द अरण्य आणि उंच डोंगराच्या गराड्यात वसलेले एक टुमदार खेडे.  इ. स. १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळकोकणात स्वारी केली त्यावेळी स्वराज्यात सामील झालेल्या प्रदेशात संगमेश्वरचा देखील समावेश होता. तेव्हा या भागातील अनेक माणसे स्वराज्याच्या कार्यात आली. संभाजीराजांचे गुरू केशव पंडित यांचेही गाव संगमेश्वर . तसेच शंभूराजांची सासुरवाडी - शृंगारपूर - देखील संगमेश्वरहून जवळच होते. दक्षिण दिग्विजयासाठी निघताना महाराजांनी युवराजांना शृंगारपूरास राहण्याची आज्ञा केली होती. त्यावेळी संभाजीराजांचे या भागात बराच काळ वास्तव्य होते. अशा प्रकारे, ते या परिसराशी जोडले गेले. पुढे ते छत्रपती झाल्यानंतरही त्यांचे अनेकदा या भागात वास्तव्य...

छत्रपती शिवराय : एक बहुश्रुत व्यक्तिमत्त्व

    शालेय स्तरावर प्रत्येकाने इतिहास, राज्यशास्त्र  (नागरिकशास्त्र), भूगोल अशा विषयांचा अभ्यास केला आहे. मी कला शाखेची विद्यार्थिनी असल्याने आता विविध सामाजिक शास्त्रे ( social sciences ) आम्हाला विशेषत्वाने अभ्यासण्यासाठी आहेत. या विषयांचा अभ्यास करताना, सतत असं जाणवते की आपण शिकत आहोत ते विषय शिकण्यामागचा हेतू, त्यातील अनेक संकल्पना प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे शिवचरित्रात वाचल्या आहेत, किंवा संकल्पनांना समर्पक उदाहरणे वाचली आहेत. त्याच अनुषंगाने आजचा हा लेख.... 1. History :  महाराजांच्या पूर्वी जे शासक होऊन गेले त्यांच्याकडून ज्या चुका घडल्या होत्या त्या महाराजांनी होऊ दिल्या नाहीत. उदा. यादवकालीन कमकुवत हेरखाते ; अनेक राजांचा सदैव बचावात्मक पवित्रा ( आत्मसंरक्षणात्मक धोरण ) या चुका महाराजांनी टाळल्या. तसेच पूर्वीच्या शासकांच्या चांगल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. उदा. प्राचीन प्रशासन पद्धती, इ.  म्हणजेच ' जे चांगले ते घेणे व पूर्वी ज्या चुका घडल्या असतील त्यातून शिकणे ' असे इतिहासाचे योग्य आकलन महाराजांनी केलेले दिसते.  2. Political science / politics...

किल्ले जयगड

महाराष्ट्राला लांबच लांब किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचे स्वरूप खडकाळ आहे, इथले किनारे अरुंद आहेत आणि अनेक ठिकाणी तर डोंगरांनी आपले पाय थेट समुद्रापर्यंत पसरलेले दिसतात. समुद्रकिनारी, नद्यांच्या मुखाशी स्थित अशा बऱ्याच भू-शिरांनी तटा - बुरुजांचे पागोटे चढवलेले आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या राखणदारासरखे ते डोळ्यात तेल घालून जणू समोरच्या दर्यावर खडा पहारा करीत असतात. या रखवालदारांना म्हणतात - सागरीदुर्ग . समुद्रकिनारी, नदी किंवा खाडीच्या मुखाशी असलेल्या भू-शिरावर / जमिनीच्या टोकावर हे किल्ले बांधलेले असतात. बहुतेक वेळा तीन बाजूंनी हे पाण्याने वेढलेले असून चौथी बाजू जमिनीला जोडलेली असते. जमिनीच्या बाजूला खोल खंदक खोदलेला असतो. या खंदकात पाणी राहू नये अशी व्यवस्था केलेली असते. पश्चिम किनाऱ्यावर बघायला मिळणारा हा किल्ल्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. कोकणात किंवा एकूणच पश्चिम तटाची भौगोलिक रचनाच अशी आहे की निसर्गतः इथे अनेक बंदरे निर्माण झाली आहेत. सहाजिकच इथे अतिप्राचीन काळापासून समुद्र आणि खाड्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार व वाहतूक होत आली आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिक...

छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकामुळे भारतात दीर्घकाळानंतर एतद्देशीयांचे सार्वभौम सिंहासन निर्माण झाले. या नवीन राज्याला आकार देण्यासाठी तसेच प्रशासनात नीट - नेटकेपणा आणण्यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. आजच्या या लेखातून आपण याच अष्टप्रधान मंडळाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. छत्रपती शिवरायांनी खरेतर आपल्या मंत्रिमंडळाची स्थापना टप्याटप्याने केली. वयाच्या १२ व्या वर्षी जेव्हा महाराज बंगळूरहून पुण्यास परतले तेव्हा शहाजी राजांनी त्यांना पेशवा, मुजुमदार, सरनौबत, डबीर व सबनीस हे अधिकारी दिले होते. म्हणजे सुरूवातीपासूनच स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी हे मंत्री नियुक्त होते. पुढे गरजेनुसार महाराजांनी मंत्रिमंडळात नवीन पदे निर्माण केली. यासाठी त्यांनी प्राचीन व प्रचलित राजवटींची कार्यपद्धती डोळ्यासमोर ठेवली होती. राज्याभिषेकसमयी स्वराज्याचे प्रशासन पाहण्यासाठी तसेच सल्लागार म्हणून महाराजांनी आठ मंत्री असलेल्या प्रधानमंडळाची स्थापना केली. हे अष्टप्रधान होते :  (१) पंतप्रधान ( पेशवा ) (२) पंतअमात्य ( मुजुमदार )  (३) पंत सचिव ( सुरनीस ) (४) सरसेनापती ( सरनौबत )...

" ज्याचे आरमार त्याचाच समुद्र !!! "

"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्र्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य करावे."  छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार व आरमार निर्मिती विषयी काय धोरण होते हे अगदी मार्मिक शब्दांत सांगणारा आज्ञापत्रातील हा मजकूर.  स्वराज्याचा विस्तार कोकणात झाला व त्याच्या सीमा दर्याला भिडल्या. अरबी समुद्र स्वराज्याची पश्चिम सरहद्द बनली. या सरहद्दीवर होता जंजिऱ्याच्या सिद्दी आणि इंग्रज, पोर्तुगीज, इत्यादी टोपीकर. (युरोपियन लोक डोक्यावर फेटा, पगडी ऐवजी टोपी घालत असल्याने त्यांना "टोपीकर" म्हटले जाई. ) या लोकांचे किनारा व समुद्रातील व्यापारावर वर्चस्व होते. तसेच त्यांच्या कोकणात वखारी होत्या. जंजिरेकर सिद्द्याचा देखील या प्रदेशावर अंमल होता. त्यामुळे केवळ कोकण काबीज करून भागले नसते. या मुलुखात स्वराज्य अबादित राहण्यासाठी किनारपट्टी व दर्या दोन्ही राखणे आवश्यक होते. हे महाराजांनी अचूकपणे हेरले आणि आरमार उभारणीकडे लक्ष दिले.  प्राचीन काळापासून जरी भारतात जहाज बांधणी होत असली तरी मध्ये बराच काळ एतद्देशीय सत्तेच्...

के तख्त तज्यो अवरंग...... ( औरंगजेबाने तख्ताचा त्याग केला !!! )

" यावन रावन की सभा, संभू बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग ।। जो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग । त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग !!! "  औरंगजेबाच्या दरबारात कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांची स्तुती करताना म्हटलेल्या या अतिशय सुरेख काव्यपंक्ती.....  सन १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. शिवरायांच्या माघारी मराठ्यांचे राज्य खालसा करायला फारसा वेळ लागणार नाही या विचाराने बादशाह औरंगजेब दक्षिणेत उतरला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय कडवा प्रतिकार केला. याबद्दल मोगलांचा इतिहासकार महंमद हाशिम खाफीखान म्हणतो की ' दुष्ट संभाजी हा धामधूम करण्यात शिवाजीपेक्षा दहा पटीने अधिक तापदायक होता !!!' यावरून संभाजी महाराजांच्या लढ्याची तीव्रता लक्षात येते. औरंगजेब मराठ्यांमुळे इतका वैतागला होता की रागाच्या भरात त्याने आपली पगडी जमिनीवर फेकून ' संभाजीचा नायनाट केल्यावरच ती धारण करीन ' अशी प्रतिज्ञा केली. सतत नऊ वर्षे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला हैराण केले.  परंतु दुर्दैवाने १६८९ साली मुकर्रबखानान...

थोरला मनसुबा

  माझे नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊन....  ...... नमियेली सारज्या। ल्याली जडिताचे भूषण.... अज्ञानदासाचे वचन....... होऽ होऽ हो होऽ होऽ.....              डफ, तुणतुणे आणि झांजांच्या तालावर ' अफजलखान वधा'  चे रसभरीत व अंगावर शहारे आणणारे वर्णन आपण पोवाड्यातूून कधी न कधी ऐकले आहे. त्या भेटीचा थरार अनुभवला आहे.      ही घटना  विकारी नाम संवत्सर   शके १५८१ मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष शु. ७ या तिथीला घडली. त्या दिवशी इंग्रजी तारीख होती १० नव्हेंबर १६५९.        आजच्या या तिथीच्या औचित्यावर बघूयात  अफजलखान वध या घटनेेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून.....      अफजलखान कोण आणि कसा होता, हे आपण जाणतोच. त्याला त्याच्या पराक्रमावर अतिशय गर्व होता, तसेच स्वतःच्या सामर्थ्याची भयंकर घमेंड होती. खानाच्या या गर्विष्ठ, घमेंडखोर स्वभावाचा उपयोग करूनच महाराजांनी त्याचा वध केला.          परंतु खान मेला म्हणजे मोहीम संपली असे नव्हते.  खान वधाच्या दुसऱ्य...

गनिमी कावा - एक अनोखे युद्धतंत्र

'..... जी बुद्धि पांच शाहीस शत्रूच्या झुलवी,          जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी,             जी शक्ती बलोंमत्तास पदतली तुडवी.....' स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे व बुद्धी चातुर्याचे केलेले हे वर्णन किती अचूक आहे !!            आदिलशाही, मुघल या बलाढ्य शाह्या महाराष्ट्राच्या भूमीवर सत्ता गाजवत असतानाच सह्याद्री लगत असलेल्या मावळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. लवकरच युद्धप्रसंग उद्भवले. परंतु या शाह्यांच्या समोर स्वराज्याचे बळ तोकडे. तरीसुद्धा स्वराज्याने मोठमोठाली सैन्य गारद केली. हे शक्य झाले कसे ??        याचे उत्तर होते शिवाजी महाराजांची युद्धनीती ..... म्हणजेच गनिमी कावा...... आजचा लेख याच विषयी.....         गनिमी कावा हे एक युुद्धतंत्र आहे.               कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या फौजेचा संपूर्ण पराभव म्हणजेच गनिमी कावा.   हे तंत्र महाराजांनी स्वतः वि...