#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...
#सफर_ तळकोकणच्या_इतिहासाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार समजले जाणारे खारेपाटण, आजच्या मुंबई - गोवा महामार्गालगत वसलेले एक शांत व रम्य खेडे. परंतु, एके काळी हेच गाव व्यापारी जहाजांच्या येण्या-जाण्याने गजबजलेले असायचे ! कोकणात पुर्वापार व्यापार व वाहतूकीसाठी इथल्या नद्यांचा वापर होत आला आहे. सहाजिकच, या नद्यांच्या किनार्याने व त्यांच्या मुखाशी अनेक महत्त्वाची खेडी, बंदरे व व्यापारी केंद्रे उदयास आली. ‘खारेपाटण’ या गावची कथा सुद्धा अशीच काहीशी! वाघोटन नदीच्या किनार्यावर हे गाव वसलेले आहे. हिंदू, मुसलमान, जैन व ज्यू लोकांची सुद्धा येथे वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. खारेपाटण याचे मूळ प्राचीन नाव 'बळीपट्टण'. दक्षिण व उत्तर कोकणच्या शिलाहारांच्या लेखातही या नावे खारेपाटणचा उल्लेख सापडतो. शिलाहारांच्या दक्षिण कोकण शाखेतील 'धम्मियार' या राजाने येथे दुर्ग व शहर वसवल्याची नोंद त्याच वंशातील 'रट्टराज' याच्या शिलालेखात आढळते. त्या काळापसूनच, खारेपाटण हे एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पुढे, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीज प्रव...