Skip to main content

Posts

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न: किल्ले साल्हेर  इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या...

शंभूछत्रपतींचे बलिदान पर्व - सरदेसाई वाडा, कसबा संगमेश्वर

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन शौर्य आणि पराक्रमाने नटलेले आहे तर दुसरीकडे त्यांचा मृत्यु म्हणजे अतुल्य धैर्य! त्यांच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि औरंगजेबाला इथेच मूठमाती देता झाला. पण शंभूछत्रपतींच्या चरित्रातील या बलिदान पर्वाला सुरुवात झाली ती कसबा संगमेश्वर या गावी... कसबा संगमेश्वर हे अलकनंदा, शास्त्री आणि वरुणा नद्यांच्या संगमावर, गर्द अरण्य आणि उंच डोंगराच्या गराड्यात वसलेले एक टुमदार खेडे.  इ. स. १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळकोकणात स्वारी केली त्यावेळी स्वराज्यात सामील झालेल्या प्रदेशात संगमेश्वरचा देखील समावेश होता. तेव्हा या भागातील अनेक माणसे स्वराज्याच्या कार्यात आली. संभाजीराजांचे गुरू केशव पंडित यांचेही गाव संगमेश्वर . तसेच शंभूराजांची सासुरवाडी - शृंगारपूर - देखील संगमेश्वरहून जवळच होते. दक्षिण दिग्विजयासाठी निघताना महाराजांनी युवराजांना शृंगारपूरास राहण्याची आज्ञा केली होती. त्यावेळी संभाजीराजांचे या भागात बराच काळ वास्तव्य होते. अशा प्रकारे, ते या परिसराशी जोडले गेले. पुढे ते छत्रपती झाल्यानंतरही त्यांचे अनेकदा या भागात वास्तव्य...

छत्रपती शिवराय : एक बहुश्रुत व्यक्तिमत्त्व

    शालेय स्तरावर प्रत्येकाने इतिहास, राज्यशास्त्र  (नागरिकशास्त्र), भूगोल अशा विषयांचा अभ्यास केला आहे. मी कला शाखेची विद्यार्थिनी असल्याने आता विविध सामाजिक शास्त्रे ( social sciences ) आम्हाला विशेषत्वाने अभ्यासण्यासाठी आहेत. या विषयांचा अभ्यास करताना, सतत असं जाणवते की आपण शिकत आहोत ते विषय शिकण्यामागचा हेतू, त्यातील अनेक संकल्पना प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे शिवचरित्रात वाचल्या आहेत, किंवा संकल्पनांना समर्पक उदाहरणे वाचली आहेत. त्याच अनुषंगाने आजचा हा लेख.... 1. History :  महाराजांच्या पूर्वी जे शासक होऊन गेले त्यांच्याकडून ज्या चुका घडल्या होत्या त्या महाराजांनी होऊ दिल्या नाहीत. उदा. यादवकालीन कमकुवत हेरखाते ; अनेक राजांचा सदैव बचावात्मक पवित्रा ( आत्मसंरक्षणात्मक धोरण ) या चुका महाराजांनी टाळल्या. तसेच पूर्वीच्या शासकांच्या चांगल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. उदा. प्राचीन प्रशासन पद्धती, इ.  म्हणजेच ' जे चांगले ते घेणे व पूर्वी ज्या चुका घडल्या असतील त्यातून शिकणे ' असे इतिहासाचे योग्य आकलन महाराजांनी केलेले दिसते.  2. Political science / politics...

किल्ले जयगड

महाराष्ट्राला लांबच लांब किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचे स्वरूप खडकाळ आहे, इथले किनारे अरुंद आहेत आणि अनेक ठिकाणी तर डोंगरांनी आपले पाय थेट समुद्रापर्यंत पसरलेले दिसतात. समुद्रकिनारी, नद्यांच्या मुखाशी स्थित अशा बऱ्याच भू-शिरांनी तटा - बुरुजांचे पागोटे चढवलेले आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या राखणदारासरखे ते डोळ्यात तेल घालून जणू समोरच्या दर्यावर खडा पहारा करीत असतात. या रखवालदारांना म्हणतात - सागरीदुर्ग . समुद्रकिनारी, नदी किंवा खाडीच्या मुखाशी असलेल्या भू-शिरावर / जमिनीच्या टोकावर हे किल्ले बांधलेले असतात. बहुतेक वेळा तीन बाजूंनी हे पाण्याने वेढलेले असून चौथी बाजू जमिनीला जोडलेली असते. जमिनीच्या बाजूला खोल खंदक खोदलेला असतो. या खंदकात पाणी राहू नये अशी व्यवस्था केलेली असते. पश्चिम किनाऱ्यावर बघायला मिळणारा हा किल्ल्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. कोकणात किंवा एकूणच पश्चिम तटाची भौगोलिक रचनाच अशी आहे की निसर्गतः इथे अनेक बंदरे निर्माण झाली आहेत. सहाजिकच इथे अतिप्राचीन काळापासून समुद्र आणि खाड्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार व वाहतूक होत आली आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिक...

छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकामुळे भारतात दीर्घकाळानंतर एतद्देशीयांचे सार्वभौम सिंहासन निर्माण झाले. या नवीन राज्याला आकार देण्यासाठी तसेच प्रशासनात नीट - नेटकेपणा आणण्यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. आजच्या या लेखातून आपण याच अष्टप्रधान मंडळाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. छत्रपती शिवरायांनी खरेतर आपल्या मंत्रिमंडळाची स्थापना टप्याटप्याने केली. वयाच्या १२ व्या वर्षी जेव्हा महाराज बंगळूरहून पुण्यास परतले तेव्हा शहाजी राजांनी त्यांना पेशवा, मुजुमदार, सरनौबत, डबीर व सबनीस हे अधिकारी दिले होते. म्हणजे सुरूवातीपासूनच स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी हे मंत्री नियुक्त होते. पुढे गरजेनुसार महाराजांनी मंत्रिमंडळात नवीन पदे निर्माण केली. यासाठी त्यांनी प्राचीन व प्रचलित राजवटींची कार्यपद्धती डोळ्यासमोर ठेवली होती. राज्याभिषेकसमयी स्वराज्याचे प्रशासन पाहण्यासाठी तसेच सल्लागार म्हणून महाराजांनी आठ मंत्री असलेल्या प्रधानमंडळाची स्थापना केली. हे अष्टप्रधान होते :  (१) पंतप्रधान ( पेशवा ) (२) पंतअमात्य ( मुजुमदार )  (३) पंत सचिव ( सुरनीस ) (४) सरसेनापती ( सरनौबत )...

" ज्याचे आरमार त्याचाच समुद्र !!! "

"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्र्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य करावे."  छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार व आरमार निर्मिती विषयी काय धोरण होते हे अगदी मार्मिक शब्दांत सांगणारा आज्ञापत्रातील हा मजकूर.  स्वराज्याचा विस्तार कोकणात झाला व त्याच्या सीमा दर्याला भिडल्या. अरबी समुद्र स्वराज्याची पश्चिम सरहद्द बनली. या सरहद्दीवर होता जंजिऱ्याच्या सिद्दी आणि इंग्रज, पोर्तुगीज, इत्यादी टोपीकर. (युरोपियन लोक डोक्यावर फेटा, पगडी ऐवजी टोपी घालत असल्याने त्यांना "टोपीकर" म्हटले जाई. ) या लोकांचे किनारा व समुद्रातील व्यापारावर वर्चस्व होते. तसेच त्यांच्या कोकणात वखारी होत्या. जंजिरेकर सिद्द्याचा देखील या प्रदेशावर अंमल होता. त्यामुळे केवळ कोकण काबीज करून भागले नसते. या मुलुखात स्वराज्य अबादित राहण्यासाठी किनारपट्टी व दर्या दोन्ही राखणे आवश्यक होते. हे महाराजांनी अचूकपणे हेरले आणि आरमार उभारणीकडे लक्ष दिले.  प्राचीन काळापासून जरी भारतात जहाज बांधणी होत असली तरी मध्ये बराच काळ एतद्देशीय सत्तेच्...

के तख्त तज्यो अवरंग...... ( औरंगजेबाने तख्ताचा त्याग केला !!! )

" यावन रावन की सभा, संभू बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग ।। जो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग । त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग !!! "  औरंगजेबाच्या दरबारात कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांची स्तुती करताना म्हटलेल्या या अतिशय सुरेख काव्यपंक्ती.....  सन १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. शिवरायांच्या माघारी मराठ्यांचे राज्य खालसा करायला फारसा वेळ लागणार नाही या विचाराने बादशाह औरंगजेब दक्षिणेत उतरला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय कडवा प्रतिकार केला. याबद्दल मोगलांचा इतिहासकार महंमद हाशिम खाफीखान म्हणतो की ' दुष्ट संभाजी हा धामधूम करण्यात शिवाजीपेक्षा दहा पटीने अधिक तापदायक होता !!!' यावरून संभाजी महाराजांच्या लढ्याची तीव्रता लक्षात येते. औरंगजेब मराठ्यांमुळे इतका वैतागला होता की रागाच्या भरात त्याने आपली पगडी जमिनीवर फेकून ' संभाजीचा नायनाट केल्यावरच ती धारण करीन ' अशी प्रतिज्ञा केली. सतत नऊ वर्षे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला हैराण केले.  परंतु दुर्दैवाने १६८९ साली मुकर्रबखानान...

थोरला मनसुबा

  माझे नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊन....  ...... नमियेली सारज्या। ल्याली जडिताचे भूषण.... अज्ञानदासाचे वचन....... होऽ होऽ हो होऽ होऽ.....              डफ, तुणतुणे आणि झांजांच्या तालावर ' अफजलखान वधा'  चे रसभरीत व अंगावर शहारे आणणारे वर्णन आपण पोवाड्यातूून कधी न कधी ऐकले आहे. त्या भेटीचा थरार अनुभवला आहे.      ही घटना  विकारी नाम संवत्सर   शके १५८१ मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष शु. ७ या तिथीला घडली. त्या दिवशी इंग्रजी तारीख होती १० नव्हेंबर १६५९.        आजच्या या तिथीच्या औचित्यावर बघूयात  अफजलखान वध या घटनेेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून.....      अफजलखान कोण आणि कसा होता, हे आपण जाणतोच. त्याला त्याच्या पराक्रमावर अतिशय गर्व होता, तसेच स्वतःच्या सामर्थ्याची भयंकर घमेंड होती. खानाच्या या गर्विष्ठ, घमेंडखोर स्वभावाचा उपयोग करूनच महाराजांनी त्याचा वध केला.          परंतु खान मेला म्हणजे मोहीम संपली असे नव्हते.  खान वधाच्या दुसऱ्य...

गनिमी कावा - एक अनोखे युद्धतंत्र

'..... जी बुद्धि पांच शाहीस शत्रूच्या झुलवी,          जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी,             जी शक्ती बलोंमत्तास पदतली तुडवी.....' स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे व बुद्धी चातुर्याचे केलेले हे वर्णन किती अचूक आहे !!            आदिलशाही, मुघल या बलाढ्य शाह्या महाराष्ट्राच्या भूमीवर सत्ता गाजवत असतानाच सह्याद्री लगत असलेल्या मावळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. लवकरच युद्धप्रसंग उद्भवले. परंतु या शाह्यांच्या समोर स्वराज्याचे बळ तोकडे. तरीसुद्धा स्वराज्याने मोठमोठाली सैन्य गारद केली. हे शक्य झाले कसे ??        याचे उत्तर होते शिवाजी महाराजांची युद्धनीती ..... म्हणजेच गनिमी कावा...... आजचा लेख याच विषयी.....         गनिमी कावा हे एक युुद्धतंत्र आहे.               कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या फौजेचा संपूर्ण पराभव म्हणजेच गनिमी कावा.   हे तंत्र महाराजांनी स्वतः वि...

सर्वसमावेशक राजा

                 आज ललिता पंचमी .......तसे बघायला गेले तर अतिशय सामान्य दिवस.  इतर ३६५ तिथींसारखी एक तिथी. परंतु इतिहासात या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना घडली होती. कोणती ????........ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!!           तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांचा   राज्याभिषेक सोहळा तर जून महिन्यात म्हणजे ज्येष्ठ शु. १३ ला संपन्न झाला होता, मग हा कोणता राज्याभिषेक ????        हा होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक.  आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेणार आहोत.       हा सोहोळा ज्या दिवशी पार पडला त्या दिवशी तिथी होती अश्विन शु. ५ म्हणजेच ललिता पंचमी. इंग्रजी   तारीख होती २४ सप्टेंबर १६७४.       शिवकालीन म्हणजे साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी समाजात वेगवेगळे पंथ होते, तसेेच काही समज, काही चालीरीती रूढ होत्या. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात, पंंथ असा भेदाभेद केला नाही. परंतु  जनमानसात या ...