Skip to main content

Posts

किल्ले जयगड

महाराष्ट्राला लांबच लांब किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचे स्वरूप खडकाळ आहे, इथले किनारे अरुंद आहेत आणि अनेक ठिकाणी तर डोंगरांनी आपले पाय थेट समुद्रापर्यंत पसरलेले दिसतात. समुद्रकिनारी, नद्यांच्या मुखाशी स्थित अशा बऱ्याच भू-शिरांनी तटा - बुरुजांचे पागोटे चढवलेले आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या राखणदारासरखे ते डोळ्यात तेल घालून जणू समोरच्या दर्यावर खडा पहारा करीत असतात. या रखवालदारांना म्हणतात - सागरीदुर्ग . समुद्रकिनारी, नदी किंवा खाडीच्या मुखाशी असलेल्या भू-शिरावर / जमिनीच्या टोकावर हे किल्ले बांधलेले असतात. बहुतेक वेळा तीन बाजूंनी हे पाण्याने वेढलेले असून चौथी बाजू जमिनीला जोडलेली असते. जमिनीच्या बाजूला खोल खंदक खोदलेला असतो. या खंदकात पाणी राहू नये अशी व्यवस्था केलेली असते. पश्चिम किनाऱ्यावर बघायला मिळणारा हा किल्ल्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. कोकणात किंवा एकूणच पश्चिम तटाची भौगोलिक रचनाच अशी आहे की निसर्गतः इथे अनेक बंदरे निर्माण झाली आहेत. सहाजिकच इथे अतिप्राचीन काळापासून समुद्र आणि खाड्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार व वाहतूक होत आली आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिक...

छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकामुळे भारतात दीर्घकाळानंतर एतद्देशीयांचे सार्वभौम सिंहासन निर्माण झाले. या नवीन राज्याला आकार देण्यासाठी तसेच प्रशासनात नीट - नेटकेपणा आणण्यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. आजच्या या लेखातून आपण याच अष्टप्रधान मंडळाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. छत्रपती शिवरायांनी खरेतर आपल्या मंत्रिमंडळाची स्थापना टप्याटप्याने केली. वयाच्या १२ व्या वर्षी जेव्हा महाराज बंगळूरहून पुण्यास परतले तेव्हा शहाजी राजांनी त्यांना पेशवा, मुजुमदार, सरनौबत, डबीर व सबनीस हे अधिकारी दिले होते. म्हणजे सुरूवातीपासूनच स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी हे मंत्री नियुक्त होते. पुढे गरजेनुसार महाराजांनी मंत्रिमंडळात नवीन पदे निर्माण केली. यासाठी त्यांनी प्राचीन व प्रचलित राजवटींची कार्यपद्धती डोळ्यासमोर ठेवली होती. राज्याभिषेकसमयी स्वराज्याचे प्रशासन पाहण्यासाठी तसेच सल्लागार म्हणून महाराजांनी आठ मंत्री असलेल्या प्रधानमंडळाची स्थापना केली. हे अष्टप्रधान होते :  (१) पंतप्रधान ( पेशवा ) (२) पंतअमात्य ( मुजुमदार )  (३) पंत सचिव ( सुरनीस ) (४) सरसेनापती ( सरनौबत )...

" ज्याचे आरमार त्याचाच समुद्र !!! "

"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्र्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य करावे."  छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार व आरमार निर्मिती विषयी काय धोरण होते हे अगदी मार्मिक शब्दांत सांगणारा आज्ञापत्रातील हा मजकूर.  स्वराज्याचा विस्तार कोकणात झाला व त्याच्या सीमा दर्याला भिडल्या. अरबी समुद्र स्वराज्याची पश्चिम सरहद्द बनली. या सरहद्दीवर होता जंजिऱ्याच्या सिद्दी आणि इंग्रज, पोर्तुगीज, इत्यादी टोपीकर. (युरोपियन लोक डोक्यावर फेटा, पगडी ऐवजी टोपी घालत असल्याने त्यांना "टोपीकर" म्हटले जाई. ) या लोकांचे किनारा व समुद्रातील व्यापारावर वर्चस्व होते. तसेच त्यांच्या कोकणात वखारी होत्या. जंजिरेकर सिद्द्याचा देखील या प्रदेशावर अंमल होता. त्यामुळे केवळ कोकण काबीज करून भागले नसते. या मुलुखात स्वराज्य अबादित राहण्यासाठी किनारपट्टी व दर्या दोन्ही राखणे आवश्यक होते. हे महाराजांनी अचूकपणे हेरले आणि आरमार उभारणीकडे लक्ष दिले.  प्राचीन काळापासून जरी भारतात जहाज बांधणी होत असली तरी मध्ये बराच काळ एतद्देशीय सत्तेच्...

के तख्त तज्यो अवरंग...... ( औरंगजेबाने तख्ताचा त्याग केला !!! )

" यावन रावन की सभा, संभू बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग ।। जो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग । त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग !!! "  औरंगजेबाच्या दरबारात कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांची स्तुती करताना म्हटलेल्या या अतिशय सुरेख काव्यपंक्ती.....  सन १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. शिवरायांच्या माघारी मराठ्यांचे राज्य खालसा करायला फारसा वेळ लागणार नाही या विचाराने बादशाह औरंगजेब दक्षिणेत उतरला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय कडवा प्रतिकार केला. याबद्दल मोगलांचा इतिहासकार महंमद हाशिम खाफीखान म्हणतो की ' दुष्ट संभाजी हा धामधूम करण्यात शिवाजीपेक्षा दहा पटीने अधिक तापदायक होता !!!' यावरून संभाजी महाराजांच्या लढ्याची तीव्रता लक्षात येते. औरंगजेब मराठ्यांमुळे इतका वैतागला होता की रागाच्या भरात त्याने आपली पगडी जमिनीवर फेकून ' संभाजीचा नायनाट केल्यावरच ती धारण करीन ' अशी प्रतिज्ञा केली. सतत नऊ वर्षे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला हैराण केले.  परंतु दुर्दैवाने १६८९ साली मुकर्रबखानान...

थोरला मनसुबा

  माझे नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊन....  ...... नमियेली सारज्या। ल्याली जडिताचे भूषण.... अज्ञानदासाचे वचन....... होऽ होऽ हो होऽ होऽ.....              डफ, तुणतुणे आणि झांजांच्या तालावर ' अफजलखान वधा'  चे रसभरीत व अंगावर शहारे आणणारे वर्णन आपण पोवाड्यातूून कधी न कधी ऐकले आहे. त्या भेटीचा थरार अनुभवला आहे.      ही घटना  विकारी नाम संवत्सर   शके १५८१ मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष शु. ७ या तिथीला घडली. त्या दिवशी इंग्रजी तारीख होती १० नव्हेंबर १६५९.        आजच्या या तिथीच्या औचित्यावर बघूयात  अफजलखान वध या घटनेेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून.....      अफजलखान कोण आणि कसा होता, हे आपण जाणतोच. त्याला त्याच्या पराक्रमावर अतिशय गर्व होता, तसेच स्वतःच्या सामर्थ्याची भयंकर घमेंड होती. खानाच्या या गर्विष्ठ, घमेंडखोर स्वभावाचा उपयोग करूनच महाराजांनी त्याचा वध केला.          परंतु खान मेला म्हणजे मोहीम संपली असे नव्हते.  खान वधाच्या दुसऱ्य...

गनिमी कावा - एक अनोखे युद्धतंत्र

'..... जी बुद्धि पांच शाहीस शत्रूच्या झुलवी,          जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी,             जी शक्ती बलोंमत्तास पदतली तुडवी.....' स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे व बुद्धी चातुर्याचे केलेले हे वर्णन किती अचूक आहे !!            आदिलशाही, मुघल या बलाढ्य शाह्या महाराष्ट्राच्या भूमीवर सत्ता गाजवत असतानाच सह्याद्री लगत असलेल्या मावळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. लवकरच युद्धप्रसंग उद्भवले. परंतु या शाह्यांच्या समोर स्वराज्याचे बळ तोकडे. तरीसुद्धा स्वराज्याने मोठमोठाली सैन्य गारद केली. हे शक्य झाले कसे ??        याचे उत्तर होते शिवाजी महाराजांची युद्धनीती ..... म्हणजेच गनिमी कावा...... आजचा लेख याच विषयी.....         गनिमी कावा हे एक युुद्धतंत्र आहे.               कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या फौजेचा संपूर्ण पराभव म्हणजेच गनिमी कावा.   हे तंत्र महाराजांनी स्वतः वि...

सर्वसमावेशक राजा

                 आज ललिता पंचमी .......तसे बघायला गेले तर अतिशय सामान्य दिवस.  इतर ३६५ तिथींसारखी एक तिथी. परंतु इतिहासात या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना घडली होती. कोणती ????........ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!!           तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांचा   राज्याभिषेक सोहळा तर जून महिन्यात म्हणजे ज्येष्ठ शु. १३ ला संपन्न झाला होता, मग हा कोणता राज्याभिषेक ????        हा होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक.  आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेणार आहोत.       हा सोहोळा ज्या दिवशी पार पडला त्या दिवशी तिथी होती अश्विन शु. ५ म्हणजेच ललिता पंचमी. इंग्रजी   तारीख होती २४ सप्टेंबर १६७४.       शिवकालीन म्हणजे साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी समाजात वेगवेगळे पंथ होते, तसेेच काही समज, काही चालीरीती रूढ होत्या. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात, पंंथ असा भेदाभेद केला नाही. परंतु  जनमानसात या ...

वाटचाल साम्राज्याकडे......

                 सन १६६५ ....... स्वराज्याच्या इतिहासातील अतिशय महत्वाचे वर्ष. स्वराज्याच्या वाढत्या उद्योगास आळा घालायला आणि शिवाजी महाराजांना जेरीस आणण्यासाठी बादशहा औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानास याच वर्षी स्वराज्यावर पाठवले. त्यातूनच पुढे महाराजांनी  ' पुरंदरचा तह ' केला. स्वराज्याच्या व रयतेच्या हितासाठी त्यांनी राज्यातील २३ किल्ले व त्या खालील मुलुख मोगलांना दिला. नंतर स. १६६६ मध्ये महाराज आग्ऱ्यास गेले. तिथे त्यांना कैद झाली. परंतु अतिशय कल्पकतेने ते तिथून सुटले. स्वराज्यात परत आले.           या घटनेचे रोमहर्षक वर्णन आपण कित्येकदा ऐकले व वाचले आहे. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे स. १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले. पण स.१६६७ ते स.१६७४ या काळात स्वराज्यात काय काय घडले ? मोगलांना दिलेल्या त्या २३ गडांचे काय झाले ?? स्वराज्य पुन्हा बलशाली कसे बनले ??? अशाच काही प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार,   आजच्या या लेखातून स.१...

नाते इतिहासाशी.......

      उपयोग !!! कोणतीही गोष्ट करताना आपण त्या गोष्टीचा आपल्याला पुढे काय उपयोग होईल हे बघतो. त्यात काही गैर नाही. शाळेत आपण जे शिकतो त्याचा दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग होत असतो.      भाषा, विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपण वापर करतोच. परंतु या सगळ्यांच्या सोबतीला अजुन एक महत्वाचा विषय आहे. सगळ्यांना परिचित पण तितकाच अपरिचित देखील. त्याबद्दल खूप लोकांना कुतूहल वाटते पण त्या वाटेला फारसे कोणी जात नाही. हा विषय म्हणजे इतिहास. नमस्कार,       आजच्या या लेखातून आपण इतिहास  हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया.        इतिहासाबद्दल एक सर्वसामान्य समज आहे की इतिहास म्हणजे तारखा ! शके !! इतिहास म्हणजे युद्ध !! पण खरोखर विचार केला तर,  इतिहास म्हणजे एखाद्या प्रदेशाची भाषा, तेथील संस्कृती, दैनिक जीवन, लोकांची विचारधारा, नैसर्गिक वैशिष्ट्ये या सगळ्या घटकांचे एक सुंदर मिश्रण असते.  उदाहरणार्थ, महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास मराठी भाषा वगळणे शक्य नाही, त्या बरोबरच संतांचे कार्य, या...

"स्वराज्याचे सार ते दुर्ग !!!"

           "नवे जुने तीनशे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत."        हे वाक्य म्हणजे महाराष्ट्रातील रयतेचा अभिमान आहे, विश्वास आहे, स्वाभिमान आहे. या वाक्यानेच सामान्य रयतेस बलाढ्य शत्रूशी लढण्याचे बळ दिले, उमेद दिली. हे वाक्य आहे एका युगपुरुषाचे, स्वराज्याचे  पहिले छत्रपती......... छत्रपती शिवाजी महाराजांचे !! नमस्कार,     छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट यांचे नाते  हे या गडांसारखेच अभेद्य आहे. हे गड ज्या सह्याद्रीवर विराजमान आहेत त्याची सह्याद्री - कणा स्वराज्याचा या लेेखातून आपण ओळख करून घेतली होती. आज आपण शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांचे नाते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.       सह्याद्रीच्या शिखरांवर कित्येक लहान मोठे गड       आहेत. यातले बरेचसे गड शिवाजी महाराजांच्या आधी होऊन गेलेल्या शासकांनी बांधलेले. पण महाराजांनी या गडकोटांना एकत्र गुंफले आणि स्वराज्य उभे केले.      स्वराज्याच्या मुलुखात अने...