उपयोग !!! कोणतीही गोष्ट करताना आपण त्या गोष्टीचा आपल्याला पुढे काय उपयोग होईल हे बघतो. त्यात काही गैर नाही. शाळेत आपण जे शिकतो त्याचा दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग होत असतो.
भाषा, विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपण वापर करतोच. परंतु या सगळ्यांच्या सोबतीला अजुन एक महत्वाचा विषय आहे. सगळ्यांना परिचित पण तितकाच अपरिचित देखील. त्याबद्दल खूप लोकांना कुतूहल वाटते पण त्या वाटेला फारसे कोणी जात नाही. हा विषय म्हणजे इतिहास.
नमस्कार,
आजच्या या लेखातून आपण इतिहास हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया.
इतिहासाबद्दल एक सर्वसामान्य समज आहे की इतिहास म्हणजे तारखा ! शके !! इतिहास म्हणजे युद्ध !! पण खरोखर विचार केला तर,
इतिहास म्हणजे एखाद्या प्रदेशाची भाषा, तेथील संस्कृती, दैनिक जीवन, लोकांची विचारधारा, नैसर्गिक वैशिष्ट्ये या सगळ्या घटकांचे एक सुंदर मिश्रण असते.
उदाहरणार्थ, महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास मराठी भाषा वगळणे शक्य नाही, त्या बरोबरच संतांचे कार्य, या प्रदेशावर झालेली आक्रमणे, शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराज्याची शिकवण, त्या अनुषंगाने लोकांची विचारधारा तसेच सह्याद्री व इतर पर्वत रांगांमुळे मिळालेले नैसर्गीक अभेद्यपण, ई. या साऱ्याचे एकत्र एकजीव रूप म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास.
इतिहासातील या सर्व घटकांमुळे एखाद्या प्रदेशाविषयी आपुलकी निर्माण होते. कळत नकळत त्या प्रदेशाबद्दल मनात कुतहल वाटू लागते. स्थानिक कथा, दंतकथा ऐकून हे कुतूहल अधिकच वाढते. ऐतिहासिक घटनांवर आधारित कथा देखील ऐकलेल्या, वाचलेल्या असतात. ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणे त्या कथांची पुन्हा पुन्हा आठवण करून देत असतात. इतिहासातील व्यक्ती, ठिकाण, घटना याबद्दल या कथा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात...........
....... आणि कुठेतरी आपण त्याविषयी विचार करू लागतो. काय घडले, कसे घडले, का घडले, खरे काय, खोटे काय ...... असे असंख्य प्रश्न आपल्याभोवती फिरू लागतात !!
आणि या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच माझ्या मते..... ध्यास इतिहासाचा नव्याने !!!!
Superb 👌👌👍👍 .... keep it up
ReplyDelete......mau
This comment has been removed by the author.
ReplyDeleteफारच छान विचार मांडला आहे
ReplyDeleteछान लेख आहे..! तुझ्या पुढच्या लेखन प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!!
ReplyDeleteKhup sundar lekhan ahe.
ReplyDeleteKeep it up 👍🏻👏😊