Skip to main content

Posts

गनिमी कावा - एक अनोखे युद्धतंत्र

'..... जी बुद्धि पांच शाहीस शत्रूच्या झुलवी,          जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी,             जी शक्ती बलोंमत्तास पदतली तुडवी.....' स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे व बुद्धी चातुर्याचे केलेले हे वर्णन किती अचूक आहे !!            आदिलशाही, मुघल या बलाढ्य शाह्या महाराष्ट्राच्या भूमीवर सत्ता गाजवत असतानाच सह्याद्री लगत असलेल्या मावळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. लवकरच युद्धप्रसंग उद्भवले. परंतु या शाह्यांच्या समोर स्वराज्याचे बळ तोकडे. तरीसुद्धा स्वराज्याने मोठमोठाली सैन्य गारद केली. हे शक्य झाले कसे ??        याचे उत्तर होते शिवाजी महाराजांची युद्धनीती ..... म्हणजेच गनिमी कावा...... आजचा लेख याच विषयी.....         गनिमी कावा हे एक युुद्धतंत्र आहे.               कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या फौजेचा संपूर्ण पराभव म्हणजेच गनिमी कावा.   हे तंत्र महाराजांनी स्वतः वि...

सर्वसमावेशक राजा

                 आज ललिता पंचमी .......तसे बघायला गेले तर अतिशय सामान्य दिवस.  इतर ३६५ तिथींसारखी एक तिथी. परंतु इतिहासात या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना घडली होती. कोणती ????........ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!!           तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांचा   राज्याभिषेक सोहळा तर जून महिन्यात म्हणजे ज्येष्ठ शु. १३ ला संपन्न झाला होता, मग हा कोणता राज्याभिषेक ????        हा होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक.  आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेणार आहोत.       हा सोहोळा ज्या दिवशी पार पडला त्या दिवशी तिथी होती अश्विन शु. ५ म्हणजेच ललिता पंचमी. इंग्रजी   तारीख होती २४ सप्टेंबर १६७४.       शिवकालीन म्हणजे साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी समाजात वेगवेगळे पंथ होते, तसेेच काही समज, काही चालीरीती रूढ होत्या. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात, पंंथ असा भेदाभेद केला नाही. परंतु  जनमानसात या ...

वाटचाल साम्राज्याकडे......

                 सन १६६५ ....... स्वराज्याच्या इतिहासातील अतिशय महत्वाचे वर्ष. स्वराज्याच्या वाढत्या उद्योगास आळा घालायला आणि शिवाजी महाराजांना जेरीस आणण्यासाठी बादशहा औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानास याच वर्षी स्वराज्यावर पाठवले. त्यातूनच पुढे महाराजांनी  ' पुरंदरचा तह ' केला. स्वराज्याच्या व रयतेच्या हितासाठी त्यांनी राज्यातील २३ किल्ले व त्या खालील मुलुख मोगलांना दिला. नंतर स. १६६६ मध्ये महाराज आग्ऱ्यास गेले. तिथे त्यांना कैद झाली. परंतु अतिशय कल्पकतेने ते तिथून सुटले. स्वराज्यात परत आले.           या घटनेचे रोमहर्षक वर्णन आपण कित्येकदा ऐकले व वाचले आहे. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे स. १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले. पण स.१६६७ ते स.१६७४ या काळात स्वराज्यात काय काय घडले ? मोगलांना दिलेल्या त्या २३ गडांचे काय झाले ?? स्वराज्य पुन्हा बलशाली कसे बनले ??? अशाच काही प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार,   आजच्या या लेखातून स.१...

नाते इतिहासाशी.......

      उपयोग !!! कोणतीही गोष्ट करताना आपण त्या गोष्टीचा आपल्याला पुढे काय उपयोग होईल हे बघतो. त्यात काही गैर नाही. शाळेत आपण जे शिकतो त्याचा दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग होत असतो.      भाषा, विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपण वापर करतोच. परंतु या सगळ्यांच्या सोबतीला अजुन एक महत्वाचा विषय आहे. सगळ्यांना परिचित पण तितकाच अपरिचित देखील. त्याबद्दल खूप लोकांना कुतूहल वाटते पण त्या वाटेला फारसे कोणी जात नाही. हा विषय म्हणजे इतिहास. नमस्कार,       आजच्या या लेखातून आपण इतिहास  हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया.        इतिहासाबद्दल एक सर्वसामान्य समज आहे की इतिहास म्हणजे तारखा ! शके !! इतिहास म्हणजे युद्ध !! पण खरोखर विचार केला तर,  इतिहास म्हणजे एखाद्या प्रदेशाची भाषा, तेथील संस्कृती, दैनिक जीवन, लोकांची विचारधारा, नैसर्गिक वैशिष्ट्ये या सगळ्या घटकांचे एक सुंदर मिश्रण असते.  उदाहरणार्थ, महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास मराठी भाषा वगळणे शक्य नाही, त्या बरोबरच संतांचे कार्य, या...

"स्वराज्याचे सार ते दुर्ग !!!"

           "नवे जुने तीनशे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत."        हे वाक्य म्हणजे महाराष्ट्रातील रयतेचा अभिमान आहे, विश्वास आहे, स्वाभिमान आहे. या वाक्यानेच सामान्य रयतेस बलाढ्य शत्रूशी लढण्याचे बळ दिले, उमेद दिली. हे वाक्य आहे एका युगपुरुषाचे, स्वराज्याचे  पहिले छत्रपती......... छत्रपती शिवाजी महाराजांचे !! नमस्कार,     छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट यांचे नाते  हे या गडांसारखेच अभेद्य आहे. हे गड ज्या सह्याद्रीवर विराजमान आहेत त्याची सह्याद्री - कणा स्वराज्याचा या लेेखातून आपण ओळख करून घेतली होती. आज आपण शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांचे नाते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.       सह्याद्रीच्या शिखरांवर कित्येक लहान मोठे गड       आहेत. यातले बरेचसे गड शिवाजी महाराजांच्या आधी होऊन गेलेल्या शासकांनी बांधलेले. पण महाराजांनी या गडकोटांना एकत्र गुंफले आणि स्वराज्य उभे केले.      स्वराज्याच्या मुलुखात अने...

औचित्य राज्याभिषेकाचे....

सरित्पतेचे जल मोजवेना     मध्यांन्हीचा भास्कर पाहवेना !  मुठीत वैश्र्वानर बांधवेना     तैसे शिवाजी नृप जिंकवेना !!           सभासद बखरीतील या ओळी वाचल्या की डोळ्यासमोर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या एकेक कथा उभ्या राहतात...      प्रतापगडाचा तो पायथा, तो लाल महाल, सुरत शहर, आग्र्याचा तो दरबार, ती पेटाऱ्यातून सुटका आणि मग ..... मग राज्याभिषेकाचा तो सुवर्ण क्षण.          हा दिवस म्हणजे महाराष्ट्रातील रयतेसाठी सर्वात मोठा सण. राज्याभिषेक ही स्वराज्यातील महत्वाची घटना होती हे आपण जाणतोच. पण त्या वेळी अजून काही लहान मोठ्या गोष्टी घडल्या ज्यांचा उल्लेख एकेका वाक्यात होतो. या घटनांचे महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न आज आपण करूया... नमस्कार ,         आज ज्येष्ठ शु. १३ ..... ३४६ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे   श्री नृपशालिवाहन शके १५९६ , आनंदनाम संवत्सरे , ज्येष्ठ शु. १३ , शनिवार ,सूर्योदयापूर्वी तीन घटका , उषःकाली शुभ मुहूर्तावर शिवाजी महाराज  क्षत्रियकुल...

सह्याद्री - कणा स्वराज्याचा

दुर्गम, कणखर, अभेद्य.... हे वर्णन आहे सह्याद्रीचे. नमस्कार , आज आपण सह्याद्रीची ओळख करून घेणार आहोत. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या डोंगर रांगा तयार झाल्या. त्यामुळे सह्याद्रीत मुख्यतः basalt दगड सापडतो.  हे डोंगर म्हणजे महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक. सह्याद्रीचा हा भूप्रदेश अतिशय अवघड. धो धो कोसळणारा पाऊस, डोंगर, दऱ्या, नद्या, अरण्य ....  बघायला गेले तर या मुलुखाची व्यवस्था ठेवणे सोपे नाही. पण ठेवणे गरजेचे. म्हणूनच त्यासाठी इथे पर्वतांच्या शिखरांवर लहान - मोठे गड बांधण्यात आले. बांधकामात इथल्या कातळ ( basalt ) दगडाचा वापर केला जाई.हे सारे गड यादव, शिलाहार, सातवाहान, बहामनी सुलतान, निजामशाही, आदिलशाही यांनी वेगवेगळ्या काळात गरजेनुसार बांधले.  परंतु गड - किल्ल्यांचे खरे सामर्थ्य ओळखून त्यांचा उपयोग फक्त मुलुखाच्या व्यवस्थेसाठी न करता ,  त्याचा स्वराज्य बांधणीसाठी वापर करणारे होते  छत्रपती शिवाजी महाराज....!  गड - किल्ल्यांचे महत्त्व किती होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. स्वराज्याच्या प्रत्येक लढाई मध्ये याचा प्रत्यय आलेला दिसतोच.  आधी उल्...

गड ...............शूर वीरांचे !!!!

गड किल्ल्यांबद्दल माझ्या भावना व्यक्त करणारी माझी कविता ......... गड  म्हणजे  डोंगरांवर तटा - बुरुजांचे   अलंकार जेथे कधी चालल्या होत्या तलवारी धारदार !  जेथे शूर - वीरांनी  केले होते बलिदान  जिथे कथांमध्ये आहे शौर्य आणि अभिमान ! गड म्हणजे नाही फक्त  पडक्या भिंती अन् वाडे गडाचा प्रत्येक दगड गातो कित्येक पोवाडे !! गड म्हणजे  ' जय भवानी जय शिवाजी !' चा जयघोष गडावर असतो  एक वेगळाच जोश !  गडावरचा वारा सांगतो सारा इतिहास, एकदा निरखून पहा तुम्हालाही होईल आभास.....

एक नवीन सुरुवात

 नमस्कार , मी अदिती कुलकर्णी , आज एक नवीन सुरुवात करत आहे. इतिहासाच्या आवडीतून निर्माण झालेल्या जिज्ञासेपोटी  मी त्याचा अभ्यास सुरु केला .त्यातून झालेल्या इतिहासाच्या आकलनाचे हे संकलन