Skip to main content

सह्याद्री - कणा स्वराज्याचा

दुर्गम, कणखर, अभेद्य.... हे वर्णन आहे सह्याद्रीचे.

नमस्कार ,
आज आपण सह्याद्रीची ओळख करून घेणार आहोत.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या डोंगर रांगा तयार झाल्या.
त्यामुळे सह्याद्रीत मुख्यतः basalt दगड सापडतो. 

हे डोंगर म्हणजे महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक.
सह्याद्रीचा हा भूप्रदेश अतिशय अवघड.

धो धो कोसळणारा पाऊस, डोंगर, दऱ्या, नद्या,
अरण्य .... 

बघायला गेले तर या मुलुखाची व्यवस्था ठेवणे सोपे नाही. पण ठेवणे गरजेचे. म्हणूनच त्यासाठी इथे पर्वतांच्या शिखरांवर लहान - मोठे गड बांधण्यात आले. बांधकामात इथल्या कातळ ( basalt ) दगडाचा वापर केला जाई.हे सारे गड यादव, शिलाहार, सातवाहान, बहामनी सुलतान, निजामशाही, आदिलशाही यांनी वेगवेगळ्या काळात गरजेनुसार बांधले. 

परंतु गड - किल्ल्यांचे खरे सामर्थ्य ओळखून त्यांचा उपयोग फक्त मुलुखाच्या व्यवस्थेसाठी न करता , 
त्याचा स्वराज्य बांधणीसाठी वापर करणारे होते 
छत्रपती शिवाजी महाराज....! 

गड - किल्ल्यांचे महत्त्व किती होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. स्वराज्याच्या प्रत्येक लढाई मध्ये याचा प्रत्यय आलेला दिसतोच. 
आधी उल्लेख केल्या प्रमाणे सह्याद्री खूप अवघड. पण त्याच्या या दुर्गमतेचाही शिवाजी महाराजांनी अत्यंत खुबीने वापर केला. 
म्हणजे गडांबरोबरच उंचच उंच पर्वत, खोल खोल दऱ्या, सूर्य प्रकाशही जिथ्वर पोहचू शकणार नाही अशी अरण्ये, सुसाट वेगाने वाहणाऱ्या नद्या, शिवशंकराचे तांडव भासेल असा मुसळधार पाऊस......या सगळ्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण. 
      सह्याद्रीच्या साह्याने स्वराज्याने कित्येक मोठे शत्रू अक्षरशः लोळवले. सह्याद्रीच्या या कामगिरीमुळेच तर तो बनला ...... कणा स्वराज्याचा !!!


या कण्यावर असलेल्या चिलखतीचा म्हणजेच महाराजांनी बांधलेल्या व स्वराज्यातील काही प्रमुख गडांचा आपण पुढे अभ्यास करूया ... 








Comments

  1. सह्याद्रीचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. फारच ओघवती भाषा.
    अचूक वर्णन. झकास.

    ReplyDelete
  3. Khup sundar...........aditi.👍👍

    From shreya

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...