Skip to main content

Posts

Showing posts from July, 2025

शंभू राजांच्या नजरेतून शिवराज्याभिषेकाचे वर्णन

‘या युगी पृथ्वीवर सर्व म्लेंच्छ बादशाह. मराठा पातशाह येवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काहीं सामान्य झाली नाही.’  सभासद बखरीत शिवराज्याभिषेकाचे हे अजरामर वर्णन सर्वश्रुत आहे. राजाभिषेकाच्या या अभुतपूर्व सोहळ्याचे वर्णन अनेकांनी आपापल्या परीने करून ठेवले आहे. यातील काहींनी ऐकीव माहितीच्या आधारे वर्णन लिहिले तर अनेकांनी तो सोहळा प्रत्यक्ष याची देहि, याची डोळा अनुभवला. त्यामध्ये कृष्णाजी अनंत सभासदासारखे बखरकार, निश्चलपुरी गोसावी सारखे साधू, हेन्‍री ऑक्झेंडन सारखे टोपीकर, इ. अनेकांचा समावेश आहे. यापैकी एक अतिशय महत्त्वाचे नाव म्हणजे युवराज संभाजी राजे. राज्याभिषेकप्रसंगी, संभाजी राजांना देखील युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला होता. राज्याभिषेक ही घटना केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष सिंहासनारोहणाच्या आधी व नंतरही अनेक दिवस हा सोहळा सुरू होता. शिवकालात रायगडाचे वास्तुवैभव, तुलादान व अन्य विधी, तसेच राज्याभिषेकाची एकूणच व्याप्ती व स्वरूप याचे संक्षिप्त परंतु गौरवपूर्ण वर्णन युवराजांनी आपल्या ‘बुधभुषण’ या राजनीतीपर ग्रंथात केलेले आहे. राजाभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने ते अ...