'छत्रपती शिवाजी महाराज' हे तीन शब्द अक्षरशः मंतरलेले आहेत. महाराजांचे अवघे आयुष्य - अवघे शिवभारत केवळ पन्नास वर्षांचे! पण त्याची व्याप्ती, त्याचे विविध पैलू आजही सुसंगत वाटणारे. महाराष्ट्राला तर या नावाने मोहिनी घातली आहे. परंतु महाराष्ट्राबाहेरही कविराज भूषण, छत्रसाल यासारख्या कित्येक लोकांना शिवचरित्राने भारावून टाकले. भूषण आपल्या एका छंदात म्हणतात, " सिव चरित्र लखी यों भयो कबि भूषन के चित्त | भाँति भाँति भूषनिनि सों भूषित करौ कबित्त ||" अर्थात 'शिवरायांचे चरित्र पाहून भूषणाचे कवीमन विलोभले. भूषण म्हणतो काव्य अशाच विषयावर (शिवचरित्रावर) करावेसे वाटते जेथे विविध अलंकार शोभून दिसतात!" एतद्देशीयांच्या बरोबरीने परकियांनाही महाराजांच्या पराक्रमाचा व एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अचंबा वाटल्याशिवाय राहिला नाही. जितक्या वेळा वाचावे, ऐकावे, बोलावे तितक्या वेळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू नव्याने उलगडत जातो. एक उत्कृष्ट योद्धा, प्रजेच्या सुखासाठी कटिबद्ध असा दक्ष शासक, सावध आणि मुत्सद्दी राजनीतितज्ञ, उत्तम दुर्गस्थापत्यकार या आणि अशा कित्येक गुणांमु...
Trying to read between the lines of the golden pages of HISTORY and its relevance to the modern age......