छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन शौर्य आणि पराक्रमाने नटलेले आहे तर दुसरीकडे त्यांचा मृत्यु म्हणजे अतुल्य धैर्य! त्यांच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि औरंगजेबाला इथेच मूठमाती देता झाला. पण शंभूछत्रपतींच्या चरित्रातील या बलिदान पर्वाला सुरुवात झाली ती कसबा संगमेश्वर या गावी... कसबा संगमेश्वर हे अलकनंदा, शास्त्री आणि वरुणा नद्यांच्या संगमावर, गर्द अरण्य आणि उंच डोंगराच्या गराड्यात वसलेले एक टुमदार खेडे. इ. स. १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळकोकणात स्वारी केली त्यावेळी स्वराज्यात सामील झालेल्या प्रदेशात संगमेश्वरचा देखील समावेश होता. तेव्हा या भागातील अनेक माणसे स्वराज्याच्या कार्यात आली. संभाजीराजांचे गुरू केशव पंडित यांचेही गाव संगमेश्वर . तसेच शंभूराजांची सासुरवाडी - शृंगारपूर - देखील संगमेश्वरहून जवळच होते. दक्षिण दिग्विजयासाठी निघताना महाराजांनी युवराजांना शृंगारपूरास राहण्याची आज्ञा केली होती. त्यावेळी संभाजीराजांचे या भागात बराच काळ वास्तव्य होते. अशा प्रकारे, ते या परिसराशी जोडले गेले. पुढे ते छत्रपती झाल्यानंतरही त्यांचे अनेकदा या भागात वास्तव्य...
Trying to read between the lines of the golden pages of HISTORY and its relevance to the modern age......