आज ललिता पंचमी .......तसे बघायला गेले तर अतिशय सामान्य दिवस. इतर ३६५ तिथींसारखी एक तिथी. परंतु इतिहासात या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना घडली होती. कोणती ????........ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!! तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर जून महिन्यात म्हणजे ज्येष्ठ शु. १३ ला संपन्न झाला होता, मग हा कोणता राज्याभिषेक ???? हा होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेणार आहोत. हा सोहोळा ज्या दिवशी पार पडला त्या दिवशी तिथी होती अश्विन शु. ५ म्हणजेच ललिता पंचमी. इंग्रजी तारीख होती २४ सप्टेंबर १६७४. शिवकालीन म्हणजे साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी समाजात वेगवेगळे पंथ होते, तसेेच काही समज, काही चालीरीती रूढ होत्या. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात, पंंथ असा भेदाभेद केला नाही. परंतु जनमानसात या ...
Trying to read between the lines of the golden pages of HISTORY and its relevance to the modern age......